---Advertisement---

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; संशयित..

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । मुलींवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून धरणगाव तालुक्यात एक धक्कदायक बाब समोर आली होती. अत्याचारातून १५ वर्षीय पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा खुलासा झाला होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दखल होऊन संशयिताला अटक करण्यात आली होती. त्यास आज  न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

विक्की रवींद्र कोळी (वय ३५) असे अटक संशयिताचे नाव आहे. पीडिता ही धरणगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागात कुटुंबीयांसह वास्तव्यास होती. दरम्यान, संशयित विक्की रवींद्र कोळी (वय ३५) याने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून गैरफायदा घेत अत्याचार केला होता. गेल्या सहा महिन्यापासून तो, सतत मुलीचे शोषण करत असल्याने पिडीता गर्भवती राहिली.

तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या भावाला मारेल, अशी धमकी पीडित मुलीला दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यात पोलिस पथकाने विक्की रवींद्र कोळी याला अटक करून आज जिल्‍हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयिताला पाच दिवस पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेशित केले. ॲड. सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment