हरियाणातील पानिपत येथून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. येथे प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. तो एवढेच करुन थांबला नाही तर त्याने मुलीला मादक पदार्थ मिसळलेले कोल्ड्रिंक पाजले आणि तिला उत्तर प्रदेशातील त्याच्या घरी घेऊन गेला. त्याने मुलीला आठ महिने त्याच्यात घरी ओलीस ठेवले.
तसेच या कालावधीत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. या दरम्यान, ही मुलगी गर्भवतीही झाली. पंरतु, त्या मुलीला घरीच गर्भपात करण्याचा दबाव टाकण्यात आला. यानंतर मुलीने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. यामुले तिला ठार मारण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकवर नेण्यात आले. काही लोक तिथे आल्यानंतर, मुलीला घरी परत आणण्यात आले. एके दिवशी मुलीने चोरी करून तिच्या प्रियकराचा फोन मिळवला. त्यानंतर तिने तिच्या आईला तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचाराची कहाणी सांगितली.
---Advertisement---
यानंतर, मुलीच्या परिवाराने पोलिसांसह घटनास्थळी पोहोचून तिची सुटका केली. सध्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून सेक्टर-२९ पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि प्रियकराचे नाव सलमान आहे. पीडित मुलगी पानिपतच्या किशनपुरा चौकी परिसरातील एका कॉलनीत राहते.
पीडितेने पोलिसांना सांगितले की ती सात बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. ती एक वर्षापूर्वी सलमानला भेटली होती. तो पानिपतमध्ये काम करायचा. कुटुंबातील सदस्य नसताना तो घरी येत असे. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा सलमानने तिला याबद्दल तिच्या कुटुंबाला सांगू नको असे सांगितले. तो स्वतः तिच्या कुटुंबाशी बोलेल असे त्याने सांगितले.
पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले की, मागील वर्षी २३ डिसेंबर रोजी सलमानने गाडीत बसवून तिला कोल्ड्रिंक प्यायला दिले. कोल्ड्रिंक पिल्यानंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील एका हॉटेलमध्ये होती. तिथे सलमानने पिस्तूल दाखवित जर तिने तिच्या संमतीशिवाय ती येथे आली आहे हे कोणाला सांगितले तर तो तिला मारून टाकेल अशी धमकी दिली.
त्यानंतर सलमान तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिने हॉटेल कर्मचाऱ्यांना तिच्यासोबत वाईट कृत्य करण्यास सांगितले, पण हॉटेल कर्मचाऱ्यांनी ती अल्पवयीन असल्याचे सांगून नकार दिला. सलमानला कुठेही पैसे न मिळाल्याने तो तिला उत्तर प्रदेशातील जलालाबाद येथील त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे तिचे आई-वडील, भाऊ, तीन बहिणी आणि मेहुणे होते. तिथे तिला एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले. त्यानंतर दररोज तिच्यासोबत वाईट कृत्य करण्यासाठी लोकांना पाठवण्यात आले.
सध्या पोलिसांनी सलमान, त्याचे आईवडील, भाऊ, तीन बहिणी आणि मेहुण्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 6 आणि बीएनएसच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल.