---Advertisement---
Mithun Manhas BCCI President 2025: बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी मुंईत बीसीसीआयच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत माजी स्थानिक क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वसाधारण सभेनंतर ही घोषणा करण्यात आली. या निवडबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एक्स वर पोस्ट करून मिथुन मन्हास यांचे अभिनंदन केले.
कोण आहे मिथुन मन्हास
मिथून मन्हास जम्मू-काश्मीरसाठी अंडर-15, अंडर-16 आणि अंडर-19 क्रिकेट खेळले आहे. ते तीन वर्षे जम्मू-काश्मीरसाठी अंडर-19 क्रिकेट खेळले. 1995 मध्ये त्यांनी जवळजवळ 750 धावा केल्या आणि देशातील सर्वाधिक अंडर-19 धावा करणारा खेळाडू ठरले. त्यांनी जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार म्हणून देखील कामगिरी बजावली आहे. या कामगिरीमुळे त्यांची उत्तर विभागाच्या संघात निवड झाली. तिथे खेळताना, मन्हास यांनी आपली ओळख निर्माण केली आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये ते प्रसिद्ध झाले. ते 17 वर्षांचे असताना त्यांनी दिल्लीच्या प्रीमियर स्पर्धेत भाग घेतला आणि तिथे खेळू लागला. त्यावेळी दिल्ली संघात वीरेंद्र सेहवाग आणि आशिष नेहरा सारखे दिग्गज होते. स्पर्धेत त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याची अंडर-19 राष्ट्रीय संघात निवड झाली. त्यानंतर, 1996 मध्ये, रणजी ट्रॉफीमध्ये त्याची दिल्ली संघात निवड झाली.
दिल्ली संघासाठी त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली. 2001-02 च्या हंगामात, तो रणजी ट्रॉफीमध्ये 1000+ धावा काढणाऱ्या पहिल्या खेळाडूंपैकी एक बनला. त्यानंतर 2006 ते 2008 पर्यंत त्यांनी दिल्ली रणजी संघाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीने 2007-08 रणजी ट्रॉफी जिंकली. यासह ते आयपीएलमध्ये देखील खेळले.
निवृत्तीनंतर बनले कोच
मिथून मन्हास यांनी 2017 मध्ये निवृत्ती घेत ते कोचिंगमध्ये आले. त्यांनी आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज इलेव्हन) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत काम केले. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काम केले.
---Advertisement---