जळगाव : शहरातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होऊन काही प्रगती पथावर असून आमदार सुरेश भोळे हे सतत शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रमुख रस्त्यांच्या विकासामुळे जळगाव शहरवासी सुखावले असून दलित वस्ती विकासासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांनी पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
यामध्ये शहरातील दलित वस्तीतील रस्ते कॉक्रीटीकरण, गटारी बांधकाम, ओपन स्पेस विकसित करणे या कामांचा समावेश आहे. या निधीच्या मंजुरी साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.
आतापर्यंत कोट्यावधीचा निधी
जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांसह कॉलन्यांमधील रस्त्यांसाठी आमदार सुरेश भोळे यांनी आतापर्यंत कोट्यावधींचा निधी आणला आहे. त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यांची कामे तयार करण्यात येत आहेत. यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शहरातील जास्तीत जास्त भगीनींनी लाभ घ्यावा यासाठीही ते महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
या मंजुरीबाबत आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहे.