---Advertisement---

Eknath Khadse : आमदार एकनाथ खडसेंनी केली राज्य सरकारची स्तुती, म्हणाले…

---Advertisement---

जळगाव : तापी मेगा रिचार्च योजना म्हणजे 25 वर्षांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. या योजनेची मुहूर्तमेढ तापी पाटबंधारे विभागामार्फत रोवली गेली होती. राज्य सरकार आणि मध्यप्रदेश सरकारमध्ये सामंजस्य करार झाल्याचा मोठा आनंद असून त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जळगावातील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार खडसे पुढे म्हणाले की, 1998 मध्ये तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना झाली होती. त्यानंतर 1999 मध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता व्हि.डी.पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी मेगा रिचार्ज प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यानंतरच्या कालखंडात ही योजना तापी महामंडळाच्या कार्यकक्षेत घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेऊन योजना हस्तांतरीत केली.

या योजनेसाठी मध्यप्रदेशच्या तत्कालीन मंत्री अर्चना चिटणीस यांच्यासमवेत पाठपुराव्यानंतर टास्क फोर्स स्थापन करण्यात आला. दरम्यानच्या काळात ना. अजित पवार हे खान्देश दौऱ्यावर असतांना त्यांनी या योजनेची पाहणी केली होती. आज 25 वर्षानंतर या योजनेचा परिपाक म्हणजे हा सामंजस्य करार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजकारणाच्या पलीकडचा हा विषय असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे आमदार खडसे म्हणाले.

2 लाख 34 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ

या योजनेचा जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 34 हजार 706 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment