जळगाव : जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला
यावेळी ते म्हणाले जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापुस व इतर पिकांचे नुकसान झाल्याने सुमारे 4 लाख शेतकरी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे 9 मार्च 2024 रोजी निदर्शनास आले आहे असे असल्यास पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे हे खरे आहे का असे असल्यास याप्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात आहे असा प्रश्न उपस्थित करून आ. एकनाथराव खडसे यांनी शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ लवकरात लवकर मिळवून देण्याची आग्रही मागणी केली.
यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले यावेळी धनंजय मुंडे म्हणाले पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असुन सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनां नुसार दि 27 मे 2024 च्या अंतरिम आकडेवारीनुसार जळगाव जिल्हयातील एकूण 2.08 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 129.59 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. खरिप 2023 अंतर्गत दि 27 मे 2024 च्या अंतरिम आकडेवारीनुसार जळगाव जिल्हाकरिता 129.59 कोटी रुपये पिक विमा नुकसान भरपाई मंजुर झाली असुन त्यापैकी 77.37 कोटी रुपये पिक विमा नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे उर्वरित नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.