दिल्लीत आमदाराने डोक्यात गोळी झाडून संपविले जीवन, सर्वत्र खळबळ

राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व राजकीय पक्ष लढतीसाठी सज्ज झाले आहेत. यातच आप पक्षासाठी धक्कादायक बातमी घडली आहे. पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदार संघांचे आमदार गुरुप्रीत बस्सी यांनी स्वतः वर गोळी झाडात आत्महत्या केली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून  काही रिपोर्ट्सनुसार, बंदूक साफ कराताना गोगी यांना गोळी लागल्याचे उघड होत आहे..याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. आमदाराचा मृतदेह घरात पाहून त्यांच्या परिवाराला मोठा मानसिक धक्का बसला आहे. 

पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे (AAP) आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला.  गोगी यांनी स्वतः वरच  गोळी झाडून घेतल्याची चर्चा रंगली आहे.  ‘आप’च्या आमदाराचा मृत्यू कसा झाला, अचानक गोळी कशी लागली? त्यांनी ‘स्वतःवर’ गोळी झाडली की दुसऱ्याने गोळी झाडली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. 

डीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी आप आमदाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. ही घटना रात्री 12 वाजता घडली.’ पोलिस आयुक्त कुलदीप चहल आणि उपायुक्त जितेंद्र जोरवाल हे डीएमसीएचमध्ये उपस्थित आहेत. आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे.

मध्यरात्री नेमकं काय झालं?

गुरप्रीत गोगी यांनी मध्यरात्री 12 वाजता स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले गेले. गुरप्रीत गोगी शुक्रवारी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.  त्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले. त्यानंतर जेवण करून आपल्या खोलीत गेले.

त्यानंतर थोड्यावेळात खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. आवाज ऐकताच त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे धावल्या. खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात पडलेले दिसले, हे पहिल्यानंतर पत्नीच्या पायाखालची वाळूच सरकली. तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. गोगी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.