MLA Mangesh Chavan : चाळीसगाव तालुक्यात होणार नवे ६ वीज उपकेंद्र, आमदार चव्हाणांचा पाठपुरावा

जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणाऱ्या २०३० पर्यंतची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय. आय.बी. (आर.डी ५५) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या योजनेअंतर्गत चाळीसगाव विभागीय कार्यातमयासाठी एकूण ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

या योजनेमध्ये नवीन ६ उपकेंद्राची निर्मिती होणार असून या उपकेंद्राची एकूण क्षमता (५५) असणार आहे. त्यात तरवाडे गाव (१५) बिलाखेड (१५), टाकळी प्र.चा (१५), डेराबर्डी (२५), खडकी (४१०), चाळीसगाव (११०) प्रमाणे क्षमता असणार आहे. सोबतच ३ उपकेंद्रांची एकूण १५ क्षमता वाढविली जाणार आहे. त्यात शिरसगाव १५ उपकेंद्र शिरसगाव (१५), तळेगाव (१५), गणेशपूर (१५) प्रमाणे क्षमता वाढविली जाणार आहे.

नवीन डीपी रोहित्र ( ट्रांसफार्मर), एकूण १५० नग (१००१ प्रत्येकी) म्हणजे १५ डीपीची क्षमता वाढ, रोहित्र एकूण ११० नग असेल. लघुदाब वाहिनी १०८ अशी राहणार आहे. यासाठी ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. ही नवीन योजना भविष्याचा विचार करून तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मंजूर असलेली सर्व उपकेंद्र व विद्युत रोहित्राची कामे विहित वेळेत पूर्ण झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील गावांची यंत्रणा ही पुढील दहा वर्षे (२०३०) पर्यंत लागणारी वीज मागणीची पूर्तता करेल.

या योजनेमुळे विना विलंब जोडणी विद्युत ग्राहकांना मिळेल, विद्युत मंडळास ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यास मदत होईल. सोबतच योग्य दाबाने वीजपुरवठा करणेदेखील सोयीस्कर होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखभाल व दुरुस्ती करणे सुकर होईल याम ळे वीज यंत्रणेवरील ताणदेखील निश्चितपणे कमी होणार आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या अथक प्रयत्नातून वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी व ग्राहकास योग्य दाबाने व उच्च प्रतीचा अखंडित वीजपुरवठा करणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने योजना मंजूर करून घेतली असल्यानचे आम दार चव्हाण यांनी सांगितले असून, त्यांचे आभारदेखील व्यक्त केले आहे.