तळोदा : तालुक्यातील गडीकोठंडा येथील आमका नोऱ्या डोंगऱ्या (६५) यांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. याबाबत आमदार राजेश पाडवी यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ दखल घेत श्री डोंगऱ्या यांना सुरत येथील रुग्णालयात दाखल केले. आमदार राजेश पाडवी यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तळोदा तालुक्यातील गडीकोठंडा येथे आमका नोऱ्या डोंगऱ्या (६५) यांचे वास्तव्य असून त्यांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. सोमवार, २४ रोजी सकाळी ५ वाजता त्यांची तब्यत जास्त खालावली असल्याची माहिती आय. जी. फ्रेंड्स सर्कल सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ आ. राजेश पाडवी यांना याची माहिती दिली. आ. पाडवीनी तात्काळ ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देत, आजोबांना सुरत सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केले.
दरम्यान, सुरत शहारात ऍम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकली. या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी ABVP विद्यार्धी परिषदच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.हा व्हिडिओ @Awesome.surat या इंस्टाग्राम पेज वर वायरल झाला. या व्हिडिओला आता पर्यंत 1 लाख 50 हजार लोकांनी पाहिले आहे. आमदार पाडवी यांच्या कामाची दाखल गुजरातमध्ये सुद्धा घेतली गेली. आमदार राजेश पाडवी यांनी अनेकदा गोरगरिब जनतेला सहकार्य केले आहे.