MLA Satyajit Tambe: जळगावात युवक माहिती केंद्र सुरू होणार : आमदार सत्यजीत तांबे

MLA Satyajit Tambe :  युवकांसाठी  शिक्ष्ाण, उद्योजकता, नोकरी व जीवनाश्यक मूल्ये या चतुसूत्रींवर काम करत आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये जिल्हा युवक माहिती केंद्राचे काम सुरू करण्यात आले असून त्याच्या निविदाही प्रसिध्द होत असल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

शासकीय विश्राम गृह पद्मालयात बुधवार, 14 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा एका वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला आहे. या वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल ते जनतेत जात मांडत आहेत. मतदारांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरत ते त्यांचे आभार मानण्यासाठी दौरा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 159 दिवसात 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यात भेटी देत मतदारसंघातील मतदारांचे आभार मानत वर्षभरात केलेल्या कामाचा अहवाल त्यांच्यासमोर ठेवत आहेत.

युवकांसाठी इनोव्हेशन सेंटर

युवकांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा युवक माहिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार जळगाव शहरात महापालिकेच्या साने गुरूजी वाचनालयात हे केंद्र सुरू होत आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यात 300 ठिकाणी जयहिंद युथ क्लबची (वाचनालय, अभ्यासिका, स्पर्धा परिक्ष्ाा अभ्याससिका) यांची निर्मिती करण्यात येत आहे.

शिक्ष्ाकांचे पगार त्याच्या आवडत्या बँकेत

शिक्ष्ाकांचे पगार त्यांच्या आवडत्या बँकेत करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केली होते. त्यास शासनाने सकारात्मक निर्णय घेत शिक्ष्ाकांना त्यांच्या आवडीच्या बँकेत पगाराचे खाते उघडता येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

मुलींना सरसकट उच्च शिक्ष्ाण मोफत द्यावे

राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्ष्ाण मोफत देण्याचा चांगला निर्णय घेता आहे. त्याचे समर्थन करतो. यात 8 लाखापर्यतच्या उत्पन्नाची जी अट टाकली आहे ती रद्द करून सरसकट मुलींना उच्च शिक्ष्ाण मोफत द्यावे अशी मागणी शासनाकडे करणार आहे.

जळगावच्या पर्यटनासाठी प्रयत्न करणार

पर्यटन करत परदेशी पर्यटक अंजिठ्यापर्यंत येतात. त्यांनी जळगावपर्यंत यावे यासाठी चाळीसगावला शुन्याचा शोध लावणाऱ्या भास्कराचार्यांची समाधी आहे. रामायण लिहिणाऱ्या महर्षी वाल्मिकाचे स्थळ आहे या गोष्टी जगाच्या पटलावर आणले तर जळगावात पर्यटन वाढण्यास मदत होईल. त्यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत.

पक्ष्ा संपणार नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगीतल्या नुसार विरोधी पक्ष्ा हा सक्ष्ाम असावा. मजबुत काँग्रेसची गरज असल्याचे श्री. गडकरी यांनीच मांडीले आहे. विरोधी पक्ष्ा संपणे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. कोणी कोठेही गेले तरी  कोणताच पक्ष्ा संपणार नसल्याचे आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांनी सांगीतले.

 

ते त्यांचे वैयक्तीक निर्णय

सध्याच्या राजकीय परिस्थितीचे परिणाम सर्वांना सहन करावे लागणार आहेत.अनेकजण पक्ष्ाांतर करत आहेत. पक्ष्ाांतर करण्याचे निर्णय हे त्यांचे वैयक्तीक असतात. कोणी कोणाला पकडून आणत नाही. आपण असे म्हणतो की याच्यामुळे ते तिकडे गेले असतील किंवा आले असतील. हे सर्व आपले विविध तर्कवितर्क असतात. 30 ते 40 वर्ष राजकारणात घातलेल्या प्रत्येक राजकारणी जेव्हा असा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या मागे काही विचार असतात. ज्या त्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेतात. किंवा देशाच्या विकासासाठी प्रत्येकजण इकडे तिकडे जातो हेही काही खरे नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. हे सहजरित्या होत आहे याचे वाईट वाटते. यावर लोक काहीच बोलत नाही हे त्याहून वाईट असल्याचेही ते म्हणाले.