---Advertisement---

MLC Election : काँग्रेसच्या ८ आमदारांची क्रॉस व्होटींग, आ.शिरीष चौधरी काय म्हणाले ?

by team
---Advertisement---

जळगाव : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. शिवाय काही आमदारांचे नावे देखील व्हायरल झाली होती. त्यात यावल-रावेर विधान सभा मतदार संघाचे काँग्रेसचे निष्ठावान आमदार शिरीष चौधरी यांचे देखील होते. यावर आता आ. शिरीष चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आ. शिरीष चौधरी ?

आमचे घराणे निष्ठावानांचे आहे. आमची कुटुंबाची परंपरा हि काँग्रेसच्या विचारा सोबत काम करण्याची आहे.  माझे आजोबा वडील  आणि मी, आम्ही सगळे काँग्रेसचे विचार श्रद्धा ठेवून काम करत राहिल्याची भावना पत्रकार परिषदेत आ. शिरीष चौधरी यांनी  व्यक्त केली.

ते पुढे म्हणले की, फुटीर आमदारांच्या यादीत माझे नाव पाहिल्यानंतर  मला खूप आश्चर्य वाटतं आणि दुःख झालं. एवढ्यासाठी की अशा प्रकारचा गोष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही यापुढे देखील करणार नाही जे पटलं नाही तर एक वेळेस स्पष्ट तोंडावर सांगेल की आम्हाला पटत नाही आणि हे करणार नाही. नेते जरी असली तरी त्याला स्पष्ट हे सर्व आम्ही करणार नाही.  परंतु लबाडी करणे आणि क्रॉस वोटिंग करणे ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही घेणार नाही.  आमचे परिवाराची जी पार्श्वभूमी आहे, सातत्याने काँग्रेसने मी काम करतो आणि ही निष्ठा बाळगून आम्ही आजपर्यंत वाटचाल केली असतांना अशाप्रकारे माझं नाव पुढे आलेले त्याबद्दल मी विनंती आपल्याला सगळ्यांनाही करणार आहे, हे अशा प्रकारचे काम मी केलेले नाही आणि पक्षाचे नेतृत्वाने यासंबंधीची माहिती घेतलेली आहे खात्री करून घेतलेली जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे.  त्यांनी मला स्पष्ट केले की तुम्ही याच्यात नाही आहे पण असं मी सांगणं हे पक्षाचे नेतृत्व आणि याच्यात फरक आहे त्यामुळे मी त्यांच्या डिक्लेरेशनची वाट पाहतोय. मी याच्यामुळे कोणत्याही प्रकारे निराश नाही किंवा दुखी नाही. परंतु, ज्या श्रद्धेने आपण काम करतोय एक निष्ठेने आपण काम करतो त्या निष्ठेला धक्का लावण्याचे काम अशा प्रकारच्या बातम्या करत असतात. तरी स्थिरपणे आपण पक्ष सोबत राहावं हीच भूमिका माझी सुरुवातीपासून किंबहुना अपक्ष देऊन झाल्यानंतर देखील मी ताबडतोब पक्षाला कोणती अट न टाकता पाठिंबा दिला होता. आणि त्यानंतर सातत्याने मी काँग्रेस पक्षाकडून इलेक्शनमध्ये मी पडलो पण तरीदेखील मी काँग्रेस पक्षाचे आणि 19 ला पुन्हा निवडून आल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारचा आम्ही पाठिंबा दिला. हे सगळं करत असताना कुठेही अपेक्षांच्यासाठी म्हणून कुठे नाराजी व्यक्त केली नाही किंवा कुठे लबाडी केली नाही. निष्ठा कधी सोडली नाही. कायम नेतृत्वावरती विश्वास ठेवत आम्ही वाटचाल करत नाही. परंतु, या कालचे मुळे मात्र मला आश्चर्य या गोष्टीची वाटचाल ही अशोक चव्हाण हे माझे मित्र आहेत आणि म्हणून कदाचित त्यांच्या संग मित्र नाहीये जी काही काम त्यांनी केली त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याकडून घेतला की ज्यामुळे मी बघून गेलो होतो आणि म्हणून ते सांगतील तसे मला गेले पाहिजे अशी कधीही परिस्थितीत आणि त्यांच्यासारखे त्याचा कधीही आग्रहाचे दुसरी गोष्ट अशी गिरीश महाजन यांच्या मी जवळच आहे. आता कोणत्या हिशोबानी मी गिरीजींच्या जवळच आहे. ओळख आहे जिल्ह्याचे मंत्री नमस्कार चमत्कार हाय बाय होतं या पलीकडे मी कधी त्यांच्याकडे सार्वजनिक कामासाठी पत्र दिली विनंती केली जाऊन बसलो नाही. या माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी आर्थिक परिस्थिती कधी मागणी असे असताना त्यांचा मी जवळचा असेल या जिल्ह्यातील जनता देखील मला जवळून पाहते. कोणत्याही निधी भ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केले नाही. जेव्हा त्याचा उमेदीचा  काळ होता तेव्हा त्यांच्याकडे जाऊन काहीतरी फायदे करून घेतले नाही.

हे महायुती सरकार आल्यापासून माझ्या मतदार संघातील मंजूर झालेली निधी स्थगित केले गेले, वळवली गेले. नंतरच्या काळामध्ये मंजूरच केले गेले नाही. आताही या पुढच्या काळामध्ये कोणतेही काम मजूर होईल अशी मला बिलकुल अशा नाही. याचं कारण असं आहे की जे त्यांचे 180 त्याच्या पलीकडे कोणाला निधी देत नाहीत.  अशा परिस्थितीमध्ये आता पाच कोटींसाठी त्यांच्या पाया पडायचे आहे हे करणं म्हणजे राजकीय आत्मघात. असा आत्मघात करण्यासाठी मी राजकारणात नाही. आमची कुटुंबाची परंपरा आहे. काँग्रेसच्या विचारा सोबत काम करण्याची माझी आजोबा माझे वडील मी आम्ही सगळे काँग्रेसचे विचार श्रद्धा ठेवून काम करत राहिलो.  त्यामुळे आज काहीतरी फायद्यासाठी आम्ही आपल्या पक्षाची निष्ठा सोडून द्यावी.  याच्यात दूध का दूध पाणी का पाणी हे तेव्हाच होईल की जेव्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जी असतील ज्यांनी या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलं असेल आणि खात्री करून घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment