महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्षपदी अविनाश पाटील

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर अविनाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अविनाश पाटील यांनी २००६ पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शाखा अध्यक्षपदापासून त्यांनी सुरुवात केली आहे. यानंतर त्यांनी विभाग अध्यक्ष, शहर सचिव पदांवर आपला ठसा उमटविला. यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाचे जिल्हा उपाध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नेहमीच यशस्वीपणे पार पडली आहे. यासोबतच ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

अविनाश पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, २३ जून रोजी कल्याण येथे करण्यात आली आहे. शेतकरी सेना राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी ११९ शाखा अध्यक्ष युवराज कांबळे, उदय धुसिया, संपत चव्हाण, नवीन पावडे, हर्षल वाणी उपस्थित होते.

अविनाश पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अविनाश पाटील यांनी तरूण भारत लाईव्हशी बोलतांना सांगितले की, मी राजसाहेबांचे विचार तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शेतकऱ्यांसंदर्भातील ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.