यावल : तालुक्यातील नायगाव येथे व्यायामशाळेच्या इमारती बांधकाम पूर्ण होऊन जवळपास सात ते आठ वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, ही व्यायामशाळा आजही बंद अवस्थेत आहे. गावातील युवक, विद्यार्थी आणि आरोग्यप्रेमी नागरिक यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तरी, व्यायाम शाळेत साहित्य उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी मनसे रावेर लोकसभा ( विद्यार्थी) जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन नायगाव सरपंच सरपंच नूरजान सर्फराज तडवी व ग्रामसेवक दिलीप तडवी यांना देण्यात देण्यात आले आहे.

निवेदनात विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. यात व्यायामशाळेसाठी लागणारे साहित्य अद्याप उपलब्ध का झालेले नाही? ग्रामपंचायतीने व्यायाम साहित्याची मागणी केली आहे का ? केली असल्यास त्याची NOC झेरॉक्स प्रत सार्वजनिक करावी. युवकांच्या आरोग्याशी संबंधित या सुविधेचा विलंबामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ? व्यायामशाळा तात्काळ सुरु करून सार्वजनिक वापरासाठी खुली करावी अशी मागणी केली आहे.
व्यायामशाळेसाठी लागणारे साहित्य अद्यापही का आलेले नाही ? संबंधित साहित्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे का ? मागणी करण्यात असेल तर याची एनओसी झेरॉक्स प्रत आम्हाला देण्यात यावी. व्यायाम शाळा सुरु न झाल्याने युवकांना होणारे नुकसान कोण भरून काढणार? या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणाऱ्या दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यााची चौकशी करण्यात यावी. व्यायामशाळा लवकरात लवकर सुरु करून सार्वजनिक वापरासाठी खुली करण्यात यावी अन्यथा, ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनविसेनेचे निलेश पाटील, योगेश कोळी, हितेश कुंभार आदी उपस्थित होते.