धरणगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे.
धरणगाव पोलीस स्टेशन येथे मागील वर्षी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू होता. कॉ. ईश्वर पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण केले. यानंतर रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (वय ३५, रा. हरीविठ्ठल नगर, हल्ली मु. सावखेडा भिल ता.जळगाव) असे नाव चोरट्याचे निष्पन्न केले.
यानुसार सावखेडा येथे एलसीबीच्या पथकाने जाऊन तपासणी केली असता तेथे संशयित आरोपी रमेश उर्फ अनिल सोनवणे हा मिळून आला. त्याच्या अंग झडतीमध्ये चोरीस गेलेला मोबाईल मिळून आल्याने त्याला अटक करून पुढील तपासाकामी धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई प्रकरणी निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.