जळगाव : शहरातील मेहरूण तलाव येथे खेडी परिसरातील काही तरुण पोहण्यासाठी आले होते. पोहण्यासाठी जाण्यापूर्वी त्यांनी आपले मोबाईल एका दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. तासाभराच्या कालावधीनंतर ते पोहून आल्यानंतर त्यांना मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून ७ मोबाईल हस्तगत केले.
खेडी येथील नवीतेजा अशोक मिंडे हे रविवार १२ मे रोजी त्यांच्या ६ मित्रांसह मेहरुण तलाव येथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्यापुर्वी आपले ७ मोबाईल फोन हे मोटारसायकलचे डिक्कीत ठेवून पोहण्यासाठी गेले. साधारण १ तासानंतर पोहून झाल्याववर त्यांनी दुचाकीजवळ येत आपआपले मोबाईल गाडीचे डिक्कीतुन काढणेसाठी गेले असता त्यांना मोबाईल मिळुन आले नव्हते. याप्रकरणी नवीतेजा अशोक मिंडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत ८१ हजार रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल फोन चोरी गेल्याची नोंद करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांना गुप्त बातमी मिळाली होती की, या परीसरात काम करणाऱ्या एका वॉचमनने मोबाईल चोरी केले आहे अशी बातमी मिळाली होती. याबाबतीत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहीती दिली असता त्यांनी गुन्हे शोधपथकाचे अंमलदार यांना माहीती काढुन गुन्हा उघडकिस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
पोका गणेश ठाकरे याने स्वतःचे कौशल्य वापरुन सोबत टिम घेवुन अनिल रघुनाथ चव्हाण (वय ३४ वर्ष रा रोटवड तांडा ता.जामनेर जि.जळगाव) यास ताब्यात घेवुन त्याची विचारपुस करता त्यानेच ७ मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिली. त्यास गुरुवार, १६ रोजी अटक करुन त्याचेकडुन ७ मोबाईल फोन हे हस्तगत केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी, भाग जळगाव संदिप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेका सचीन मुंढे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, ललीत नारखेडे, चंद्रकांत पाटील यांनी पार पाडली आहे.