PM Modi : राखला तिरंग्याचा सन्मान…पहा व्हिडिओ

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (२३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रुप फोटोदरम्यान भारताचा तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही असेच काहीसे केले. हा व्हीडिओ व्हायरल झाला असून सर्वत्र याची चर्चा होत आहे.

https://pbs.twimg.com/ext_tw_video_thumb/1694281361186824192/pu/img/3ekRjqsfJ5tITJXF.jpg
यानंतर पीएम मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष  सिरिल रामाफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत फोटो काढले. जोहान्सबर्ग येथे बुधवारी 15 व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्रात पंतप्रधानांनी भाग घेतला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सत्रात भाग घेतला.