मोदीजी जिंकतील अन् इथे शेअर मार्केट होईल ‘टेक ऑफ’

नवी दिल्ली : निफ्टी 50 ने आज 23 मे रोजी 1 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आणि 22,800 ची नवीन पातळी गाठली. बीएसई सेन्सेक्सनेही 700 हून अधिक अंकांच्या वाढीसह 75,050 च्या पातळीला स्पर्श केला, जरी तो सर्वकालीन उच्चांक बनवू शकला नाही. वृत्त लिहेपर्यंत बाजाराची वाटचाल सुरू असून आज सेन्सेक्सही नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारातील या वाढीमागे चौथ्या तिमाहीतील कंपन्यांचे चांगले निकाल आणि आरबीआयने सरकारला दिलेला विक्रमी लाभांश हे कारण सांगितले जात आहे. तर दुसरीकडे एका अमेरिकन तज्ज्ञानेही मोदी सरकारला भारतात मोठे बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. इथे भारतातही निवडणुका जवळपास संपल्या आहेत आणि विद्यमान सरकारला आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटतो.

RBI लाभांश
भारतीय रिझर्व्ह बँक दरवर्षी भारत सरकारला लाभांश देते. यावेळी 2.11 लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. मोठी गोष्ट म्हणजे हा आकडा सरकारच्या अंदाजापेक्षा मोठा आहे. आजपर्यंत इतका मोठा लाभांश रिझर्व्ह बँकेने भारत सरकारला दिला नव्हता. या लाभांशाच्या मदतीने सरकारची वित्तीय तूट कमी होईल, जे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत आहे.