नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होतो आहे, जगभरातील वेगवेगळ्या मान्यवरांनी मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींचा देखील समावेश आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध सेलिब्रेटी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट या दोघांनी मोदींची स्तुती केली आहे.त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे जी २० चे प्रतिनिधीत्व भारताने केले आहे.
व त्यामध्ये जगभरातील अनेक देश सहभागी झाले होते. रणवीर आणि आलियानं जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची चर्चा आहे.
मोदीजी तुमचे खूप खूप अभिनंदन….तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा…. जी २० मध्ये भारत जे प्रतिनिधीत्व करतो आहे त्याचे श्रेय तुम्हाला द्यावे लागेल. आपल्या देशाला खूप मोठे भविष्य आहे. वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे महत्वाचे आहे. अशा शब्दांत रणवीरनं ट्विट केले आहे.