पंतप्रधान मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेश यात्रा करत आहे. नरेंद्र मोदी यांना अथेन्समध्ये ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन साकेलारोपौलो यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यापूर्वी अथेन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष साकेलारोपौलो यांच्या भेटीदरम्यान चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल सांगितले.
ते म्हणाले, चांद्रयान-3 चे यश हे केवळ भारताचे यश नाही तर ते संपूर्ण मानवजातीचे यश आहे.चांद्रयान-3 मोहिमेद्वारे संकलित केलेल्या डेटाचे परिणाम संपूर्ण वैज्ञानिक बंधुत्व आणि मानवजातीला मदत करतील. पंतप्रधान मोदी हे 40 वर्षांत ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सप्टेंबर 1983 मध्ये ग्रीसला भेट दिली होती.