तरुण भारत लाईव्ह । १७ मे २०२३। यावर्षी मान्सून अंदमान निकोबार तसेच केरळात उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खाते आणि स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने वर्तवले आहे. या दोन्ही संस्था नुसार यंदा मान्सून चार जून पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे अंदमानात 25 मे नंतर मानसून येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने ही मान्सून बाबत आपला अंदाज मंगळवारी जाहीर केला. यावर्षी चार जून पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अर्थात यंदा मान्सूनच्या आगमनाला थोडा विलंब होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मे महिन्याच्या 29 तारखेपासून कोसळणाऱ्या पावसाचा अभ्यास केला जाता यासाठी तीन ते पाच दिवसही लागतात. त्यानंतर केरळात मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले जाते. साधारणपणे एक जून रोजी केरळात मान्सून दाखल होत असतो यावेळी मात्र मान्सूनसाठी पाहिजे तशी स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही.
चार जून पर्यंत तो दाखल होऊ शकतो तथापि या चार दिवस मागेपुढे होऊ शकतात असे हवामान विभागाने म्हटले आहे मान्सूनच्या आगमनाला विलंब होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे साधारणपणे 22 ते 24 मे या काळात अंदमानात मानसून दाखल होत असतो आणि त्यानंतर तो केरळात येतो यासोबतच देशात मानसून चार महिनांच्या हंगामाला औपचारिक सुरुवात होत असते. पोषक वातावरणाचा अभाव आणि कमकुवत सुरुवात ही मान्सूनच्या विलंबाची कारणे ठरणार असल्याचे मत कायमेट या खाजगी हवामान विषयक संस्थेने आपल्या अंदाजात व्यक्त केले आहे.