---Advertisement---

सासूची करामत ! सुनांचे दागिने घेऊन ३० वर्षीय प्रियकरासोबत फरार

---Advertisement---

लग्न झालेल्या चार मुलांची आई आपल्या ३० वर्षीय प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकच नाही, ही महिला घरातून पळून जाताना आपल्या सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. पीडिता परिवाराच म्हणणं आहे की, आम्ही या संबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. परंतु पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड क्षेत्रातील ललितपूर जिल्ह्यात घडली आहें.

हे प्रेम प्रकरण ललितपूरच्या जखौरा येथील एका गावातील आहे. एक वयोवृद्ध महिला ३० वर्षाच्या प्रियकसोबत पळून जाताना सुनांचे दागिने घेऊन पसार झाली. या वयोवृद्ध महिलेला चार विवाहित मुलं असून महिलेच्या पतीने सांगितलं की, त्यांच्या पत्नीच एका ३० वर्षाच्या मुलासोबत अफेयर सुरु होतं. जवळपास २० दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत पळून गेली. आश्चर्याची बाब म्हणजे घरातून पळून जाताना ती सुनांचे दागिने देखील घेऊन गेली.

पीडित पतीने सांगितलं की, या संबंधी त्याने जखौरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण पोलिसांनी काही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आपलं दु:ख सांगितलं. सोबत पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पीडित कुटुंबाने न्यायाची मागणी केली. “आपल्या पतीच्या कृत्यामुळे सगळं घर बरबाद झालय” असं प्रियकराच्या पत्नीच म्हणणं आहे.

पतीमुळे आज आपल्याला चारचौघात वावरताना लाज वाटतेय. महिलेने सुद्धा पतीला शोधून आणण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे. हे प्रकरण संपूर्ण भागात चर्चेचा विषय बनलं आहे. गाववाले बरच काही बोलत आहेत. पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment