---Advertisement---

धक्कादायक ! प्रियकरासाठी आईने घेतला निष्पाप लेकराचा बळी, ठार केलं अन् आजोबांसोबत झोपवलं

---Advertisement---

Crime News : असे म्हणतात की या जगातील सर्वात पवित्र आणि भावनिक नातं म्हणजे आई आणि मुलाचं. खरं तर आईला तिच्या मुलापेक्षा जास्त प्रेम कोणीही करत नाही, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण आई आणि लेकाच्या या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्याच मुलाचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, पुढील चौकशी सुरु केली आहे.

पोलीस सूत्रानुसार, मनीषा यादव असे आरोपी महिलेचे नाव आहे. सुशील यादव आणि मनीषा यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना साडेतीन वर्षांचा मुलगा होता. मात्र, मनीषा ही एक महिन्यापूर्वी गावातील प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पती सुशीलला मनीषाचा ठावठिकाणा कळला. तो तिथे पोहोचला आणि मनीषावर दबाव टाकत तिला घरी परत आणले. परंतु, घरी आल्यानंतरही, मनीषा तिच्या प्रियकरासोबत राहण्याचा आग्रह धरत होती, तिचे सासरचे त्यांच्या मुलाचा विचार करून तिला थांबवत होते. मात्र, या मुद्द्यावरून दररोज भांडणे होत होती.

रविवारी रात्री पती सुशील घरी नसताना मनीषाने तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, तिने त्याचा मृतदेह गच्चीवर झोपलेल्या तिच्या सासऱ्याजवळ ठेवला. दरम्यान, पोलिसांनी मनीषाला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. कानपूरच्या नरवालमध्ये ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांकडून आणखी चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

जळगाव : विजेचा धक्का लागून अनिता अनिल पाटील (३५, रा. मामलदे, ता. चोपडा) यांचा मृत्यू झाला. ही घटना मामलदे येथे घडली. विजेचा धक्का लागल्यानंतर महिलेला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment