मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र, अखेर मुख्यमंत्र्यांनी दिला आधार

गडचिरोली : पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपला संवेदनशीलपणा दाखवून दिला आहे.

गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील १७ वर्षीय सुनील पुंगाटी हा गंभीर आजारी असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पुढील उपचारांसाठी पैशांची अडचण भासत असल्याने त्याच्या आई-वडिलांनी मोठा त्याग करत मुलाच्या उपचारांसाठी मंगळसूत्र विकले.

हेही वाचा : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन

सुनीलच्या आई-वडिलांकडे उपचारासाठी आवश्यक निधी नव्हता. त्यांनी मोठ्या कष्टाने एक लाख रुपये उभे करत रुग्णालयात जमा केले. मात्र, उपचारांसाठी अधिक पैशांची गरज भासत होती. या परिस्थितीत पैशांची जमवा जमव करण्यासाठी त्यांनी चार दिवस उपाशी राहून संघर्ष केला.

हेही वाचा : बायकोने नवऱ्याला लावला चुना; किडनी विकायला लावली अन्… वाचाल तर थक्क व्हाल

ही बाब एका मेसेजद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर यांना मोफत उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या आदेशानुसार, सुनील पुंगाटीवर आता नागपूरच्या खासगी रुग्णालयात पूर्णपणे मोफत आणि दर्जेदार उपचार सुरू आहेत.

मंगळसूत्राचे परत मिळणार पैसे

मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या निर्णयामुळे केवळ मोफत उपचारच नव्हे, तर कुटुंबाने मंगळसूत्र विकून भरलेले एक लाख रुपयेही त्यांना परत मिळणार आहेत. एका साध्या मेसेजवरून फडणवीस यांनी घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले.