---Advertisement---

पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन ; उबाठा गटाचा इशारा

by team
---Advertisement---

वरणगाव  : येथे एका महिन्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत असून हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उबाठातर्फे करण्यात आली. यासंदर्भात निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा की, मागील दोन वर्षापासून वरणगाव शहराला महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तो देखील रात्री अपरात्री पाणी सोडण्यात येते.  यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणार त्रास दूर करुन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा  शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदनावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विलास मुळे, सुभाष चौधरी, सुनील भोई , गुणवंत भोई, आबा सोनार, संदीप पाटील, अशोक शर्मा, सुखदेव धनगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment