---Advertisement---

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ‘शिवशाहीर दादा नेवे पुरस्कार’ जाहीर

by team
---Advertisement---

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य यांचा प्रचारक ठरलेले स्वर्गीय शिवशाहीर दादा नेवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदापासून सुरू करण्यात आलेल्या “शिवशाहीर दादा नेवे पुरस्कार” खासदार डॉ. अमोल कोल्हे (सुप्रसिद्ध सिने अभिनेते) यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचा पहिला मान खा. कोल्हे यांना मिळाला आहे. या पुरस्काराचे आयोजन श्री शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले असून, पुरस्कार वितरणाचा भव्य सोहळा गुरुवारी (१७ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता, भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे पार पडणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपयेरोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे राहणार आहे. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील, शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोक शिंदे, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील या सर्वांच्या विशेष उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. संस्थेचे अध्यक्ष जयवर्धन नेवे यांनी सर्व शिवप्रेमी, नागरिक आणि युवा वर्गाला या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment