---Advertisement---

खा. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे दलाल तसेच राजकीय शत्रू : मंत्री महाजन

---Advertisement---

भारतीय जनात पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. खा. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे मध्यस्थ आणि राजकीय शत्रू असल्याचा आरोप मंत्री महाजन यांनी केला. ते मंगळवारी (३ जून ) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी भाजप राज्यात सत्तेत नसेल तेव्हा महाजन हे पक्ष सोडणारे पहिले नेते असतील अशी टीका केली होती. या टीकेला मंत्री महाजन यांनी उत्तर दिल्याचे मानले जात आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी पुढे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांचा पक्ष संजय राऊत संपवीत आहेत, यामुळे ठाकरे यांना कोणत्याही राजकीय शत्रूची आवश्यकता नाही. संजय राऊत यांच्यामुळे नेते पक्ष सोडत आहे. संजय राऊत यांनी शिवसेना ठाकरे पक्षातून नेत्यांसोबत प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकले आहे.

मंत्री महाजन म्हणाले की, खा. राऊत यांनी उद्धव ठाकरेंना शरद पवार आणि काँग्रेसच्या जवळ आणले, यामुळे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचेच सर्वात मोठे नुकसान केले आहे. ते म्हणाले की, जर उद्धव ठाकरे राऊतांना लगाम घालण्यात अपयशी ठरले तर शिवसेना (उबाठा) तुटेल. मंत्री महाजन म्हणाले, खा. राऊत यांनी आपल्या पक्षाचे नुकसान केले आहे. ते मी कधीही करणार नाही. संघटनेला नुकसानकारक मी काहीही करणार नाही. माझी गणना भाजपच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांमध्ये होतो. मी २० वर्षे विरोधी पक्षात होतो. मला पक्ष बदलण्यासाठी भरपूर वेळा ऑफर आल्या तरी मी कधीही माझा पक्ष सोडला नाही.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment