खासदार उन्मेष पाटील हे संधिसाधु, कृतघ्न – डॉ. राधेश्याम चौधरी

जळगाव : खासदार उन्मेष पाटील यांनी संकटमोचक गिरीश महाजन यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन गरळ ओकली. यातून त्यांचा संधिसाधूपणा, कृतघ्नता आणि प्रसिद्धीसाठी असलेली हाव दिसून येत असल्याची टीका लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केली.

जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी, ११ रोजी  दुपारी डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही त्यांच्यावर शरसंधान साधले. याप्रसंगी जिल्हा महामंत्री अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, उपाध्यक्ष डॉ.आश्विन सोनवणे, सरचिटणीस अमित भाटिया, उपाध्यक्ष सुनील खडके, महेश जोशी, प्रसिद्धी प्रमुख मुविकोराज कोल्हे, भूषण भोळे, डॉ.क्षितिज भालेराव, प्रकाश बालानी, राहुल पाटील, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणले की, पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर खा. उन्मेष पाटील यांनी लागलीच आपले रंग बदलले मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांनी केलेले आरोपातून त्यांच्यांतील हताशपणा, वैफ़ल्यग्रस्ता, निराशा दिसून येते. त्यांचा हा प्रशिध्दीसाठीचा एक स्टंट आहे. ज्या पक्षाने आपणास आमदार, खासदार केले त्या पक्षाचे जेव्हा ऋण फेडण्याची वेळ आली तेव्हा पक्षातून पळपुटेपणा केला. तो लपविण्यासाठी; त्यावरून लोकांचे लक्ष भरकटविण्यासाठी त्यांनी हा केविलवाणी प्रयत्न केला आहे.आता ते गटसचिवांच्या मुद्यावर कळवळा दाखवत आहेत. त्यांनी हाच कळवळा शेतकऱ्यांच्या मुद्यावर काही वर्षांपूर्वी दाखवला असता तर कदाचित त्यांचे तिकीट गेले नसते. काल त्यांनी जे काही सांगितले त्यात त्यांनी फार उशिराने थोडे सांगितले. गटसचिवांचे पगार हे सोसायटीच्या वसुली झाल्यानंतर होतात. ही स्थानिक पातळीवरची समस्या असतांना याचा दोष मंत्री गिरीश महाजन यांना कसा देणार असा प्रश्न उपस्थित केला. गटसचिवाबद्दल त्यांचे प्रेम हे पुतना मावशीचे आहे. यात त्यांचा राजकीय स्वार्थ लपलेला होता. यात शेतकरी, गटसचिव यांचा कोणत्याही प्रकारची मदत कण्याचा हेतू नव्हता. पीक विमा हा खासदारांच्या अख्तरीत आहे. पीक विम्याबाबत जिल्हा बँकेचे काही चुकले होते तर त्यांना तिकीट कापल्यावर, पक्ष बदलल्यावरच का जाग आली असा प्रश्न उपस्थित केला. उन्मेष पाटील हे राजकारणातील भस्मासुरी प्रवृत्तीचे द्वेतक आहेत.

जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महाराज म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील यांनी ना. गिरीश महाजन यांच्यावर तथ्यहीन टीका केली आहे . पीक विम्याच्या प्रश्न संदर्भात आम्ही ना. गिरीश महाजन यांच्या मार्दर्शनखाली अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना केळी पीक विमा मिळावा यासाठी ना. महाजन यांनी सतत प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील विविध प्रकल्पना ना. महाजन यांच्या माध्यमातून निधी मिळाला आहे. शेलगाव बॅरेजचे पाणी ना. महाजन यांच्या माध्यमातून १०० टक्के अडविण्यात आले आहे. मोदी आवास योजनेत वंचितांचा समावेश करण्याचा निर्णय ना. महाजन घेतला होता याची आठवण करून दिली.