पारोळा : येथील धरणगाव चौफुली व एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे नेहमी अपघात होत असतात. यात महिन्याला ३० ते ३५ अपघात नियमित होऊन यात तीन ते चार जणांचा जीव गमवावा लागत आहे.यापार्श्वभूमीवर येथे स्पीड ब्रेकर बसविण्याची वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीकडे महामार्ग अधिकारी याकडे करीत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. याबाबत जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ, माजी खासदार एटी नाना पाटील यांना या संदर्भात माहिती दिली असता त्यांनी न्हाईच्या अधिकाऱ्यांना बोलवून लवकरात लवकर या ठिकाणी कामे करावे अशी तंबी दिली.
पारोळा शहरातील व एरंडोल तालुक्यांतील पिंपळकोठा येथे नागरिकांनी माजी खा. ए. टी. नाना पाटील यांना याबाबत माहिती दिली. यावेळी माजी खा. एटी नाना पाटील यांनी खा. स्मिता वाघ यांच्याशी बोलून त्यांना व न्हाईच्या अधिकाऱ्यांना पारोळा येथे धरणगाव चौफुली येथे बोलवून घेतले. दोघा आजी व माजी खासदार यांनी महामार्गाचे अधिकारी शिवाजी पवार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. तात्काळ येथे स्पिड ब्रेकर हायमॉस्ट लॅम्प लावण्याची सूचना केली. तसेच अंडर बायपास किंवा प्लाय ओव्हर ब्रिज संदर्भात सूचित केले. यावेळी न्हाईच्या अधिकाऱ्यांनी लवकरच अंडर बायपास किंवा प्लाय ओव्हर करिता पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पिंपळकोठा येथील सरपंच यांनी शाळा व गाव विरुद्ध दिशेला असल्यामुळे दररोज मुलांना सोडायला व आणायला जावे लागते अशी मोठी समस्या मांडली. यावेळी धरणगाव बायपास चौफुलीवर मोठा जमाव जमल्याने काही वेळ दुतर्फ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
याप्रसंगी सुरेंद्र बोहरा, रविंद्र पाटील, मुकुंदा चौधरी, सचिन गुजराथी, गणेश पाटील, विनोद हिंदूजा, नरेंद्र साळी, पिंटू चौधरी, अशोक चौधरी, अनिल टोळकर, शिवदास चौधरी, नरेंद्र पाटील, मनोज भटू चौधरी, गुलाब चौधरी, सुदाम चौधरी, दिलिप चौधरी , रेखा चौधरी, अँड कृतिका आफ्रे, यशोदा पाटील, समाधान पाटील, देवाभाऊ लांडगे, राकेश पाटील ,राहुल चौधरी, बाळू चौधरी आदि नागरिक व शेतकरी उपस्थित होते.