Elcid Investment च्या शेअरमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. कंपनीने एकाच दिवसात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरने फक्त एका दिवसात 66,92,535% चा बंपर परतावा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी या शेअरने दिवाळीपूर्वीच गुंतवणूकदारांसाठी दिवाळी साजरी केली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ एका दिवसात कंपनीचा शेअर 3.53 रुपयांवरून 2,36,250 रुपयांपर्यंत वाढला.
देशातील सर्वात महाग शेअर म्हणून मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेड म्हणजेच MRF कंपनीचे नाव घेतले जात होते. या कंपनीचा शेअर 1 लाख 23 हजार 19 रुपयांवर आहे. परंतु एमआरएफला मागे टाकून एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीचा शेअर भारतीय शेअर बाजारात सर्वात महागडा शेअर बनला आहे.
एकाच दिसत हा शेअर 3.53 रुपयांवरून 2,36,000 वर पोहचला आहे. म्हणजेच या कंपनीने एक दिवसांत 66,92,535 टक्के रिटर्न दिले आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड शेअर कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबर रोजी बीएसईवर पुन्हा लिस्ट झाला. या कंपनीचे मार्केट कॅप 4800 कोटी रुपयांवर आले आहे.
एलसिड इन्व्हेस्टमेंट काय करते?
Alcide Investments ही RBI अंतर्गत गुंतवणूक श्रेणीतील नोंदणीकृत नॉन-बँकिंग वित्त कंपनी आहे. कंपनीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे होल्डिंग कंपन्यांकडून मिळणारा लाभांश. एलसिड गुंतवणुकीने देशातील नंबर 1 पेंट कंपनी एशियन पेंट्समध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. देशातील आघाडीच्या पेंट कंपनीमध्ये Elcid ची 8500 कोटी रुपयांची 2.95 टक्के भागीदारी आहे. कंपनीचा इक्विटी बेस 200,000 शेअर्सचा आहे, त्यापैकी 150,000 शेअर्स प्रवर्तकांकडे आहेत.