मुक्तांगण क्रीडा महोत्सव उत्साहात

तरुण भारत लाईव्ह धरणगाव: येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात दोन दिवसीय शालेय मुक्तांगण क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील हेही उपस्थित होते.

प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांचे शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष हेमलाल भाटिया, सचिव प्रा. रमेश महाजन यांनी स्वागत केले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी संस्थेचे पदाधिकारी घनश्यामसिह बयस, रघुनाथ चौधरी, शोभा चौधरी, शांताराम महाजन, ललित उपासनी यांचे स्वागत व सत्कार केला. क्रीडा महोत्सवांत 1800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये हॉलिबॉल, खो-खो, रस्सीखेच, दोरी उड्या, बुद्धिबळ, उलटे चालणे, अडथळा शर्यत व डॉजबॉल, 50 मीटर लंगडी घेऊन धावणे, बेडूक उड्या, शेटल रन, धावणे आदी खेळांचा समावेश होता. खेळाच्या पहिल्या सत्रातले बक्षीस वितरण नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, मिलिंद सोनार तसेच दुसर्‍या दिवशीच्या सत्रात तहसील कार्यालयाचे गोडाऊनचे मॅनेजर ज्ञानेश्वर राजपूत, प्राथमिक शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा मनीषा पानपाटील, दत्तात्रय पानपाटील, पालक शिक्षक संघाचे सहसचिव समाधान मोरे व तलाठी भागवत पवार तसेच संस्थेचे पदाधिकारी तसेच दोघही विभागाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सकाळ सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक एस.एल. सूर्यवंशी यांनी, प्रास्ताविक क्रीडा शिक्षक कैलास माळी यांनी केले. आभार वर्षा पाटील व आर.पी.पवार यांनी मानले. महोत्सव यशस्वीतेसाठी क्रीडा समितीतील एस. वाय. पारखे, डी. एन. चौधरी, आर. डी. महाजन, एम. एस. परदेशी, सागर पाटील, वाय. डी. चिंचोरे, व्ही. एल. मोरे, वर्षा पाटील, स्वाती भावे व नीता महाजन यांनी परिश्रम घेतले.