---Advertisement---

मराठी सुगम संगीतातील प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन

by team
---Advertisement---

मराठी प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकरयांचं निधन झालं आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकुंद यांच्या निधनावर संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमांतून मुकुंद फणसळकर घराघरांत पोहचले होते.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मुकुंद फणसळकर उपचार घेत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

नक्षत्रांचे देणे कार्यक्रमांतून मुकुंद घराघरांत पोहचले होते.मुकुंद फणसळकर यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत.स्मरणयात्रा नावाचा त्यांचा कार्यक्रमही गाजला होता.झी टीव्हीवरच्या सारेगमप या कार्यक्रमाचे ते पहिले विजेते ठरले होते.मुकुंद फणसाळकर यांनी मराठी सिनेसृष्टीसाठी अनेक गाणी गायली आहेत.नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमामुळे ते चर्चेत आले होते. सुप्रसिद्ध भावगीत गायक अशी त्यांची ओळख होती.

त्यांचे जवळचे मित्र त्यागराज खाडीलकर यांची पोस्ट
..आणि आज तो गेला.. मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली.. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम.. रसिकांनी आम्हा दोघांनाही उमेदीचे तरुण गायक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं!.. त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती, यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या सदैव स्मरणात राहशील मित्रा.. आमच्या स्मरण यात्रेत..!!

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment