६० कोटी रुपये जमा करा, मगच परदेशात जा, अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई हायकोर्टाचा आदेश

---Advertisement---

 

मुंबई : ८ ऑक्टोबर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राला परदेशात जायचे असेल तर, त्यांना प्रथम ६० कोटी रुपये जमा करावे लागतील, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केला.

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती यांनी न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना अमेरिका आणि इतर देशांमध्ये जायचे आहे. प्रवासावर कोणतेही बंधन नाही, परंतु त्यांना पहिले ६० कोटी रुपये जमा करावे लागतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.या जोडप्यावर एकाव्यावसायिकाकडून ६० कोटी रुपये घेतल्याचा आणि ते परत न केल्याचा आरोप आहे.

व्यावसायिक दीपक कोठारी यांचा आरोप आहे की शिल्पा आणि राज कुंद्रा यांनी व्यवसायाच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे घेतले, परंतु ते त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरले. नुकतेच आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले आणि या प्रकरणासंदर्भात तिची पाच तास चौकशी केली.

अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान काही कागदपत्रांचीही तपासणी केली. शिल्पा शेट्टी यांनी सांगितले की, ती तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे प्रकरण तिच्या माजी जाहिरात कंपनी, बेस्ट डील टीव्ही प्रा. लि. शी संबंधित आहे. तिने सांगितले की, तिने एजन्सीला सर्व कागदपत्रे दिली आहेत आणि ते जे काही मागतील त्याला सहकार्य करण्यास तयार आहे.

शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीला कायदेशीर वादाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२१ च्या सुरुवातीला राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलीहोती. बिटकॉईन घोटाळ्याच्या आरोपांसाठी त्याची चौकशी सुरू आहे. या नवीन प्रकरणातही राज कुंद्राची चौकशी होऊ शकते असे वृत्त आहे.

एजन्सीने त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केल्यामुळे त्याला परदेशात जाण्यासही मनाई आहे. शिल्पा शेट्टी न्यायालयात हजर झाली, तेव्हा तिला ६० कोटी रुपये जमा केल्यानंतरच निघून जाण्यास सांगण्यात आले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत तिच्या पतीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---