पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी मध्यरात्री रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान अज्ञात वाहनावर एर्टीगा कार आदळल्याने भीषण अपघात झाला . या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. यात तिघे जण गंभीर असून एक जण किकोळ जखमी आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने खोपोलीजवळ बोरघाटात हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा अक्षरशहा चुराडा झाला आहे. जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नांवे खालील प्रमाणे –
१. अनिल सुनिल सानप, २. आशुतोष नवनाथ गांडेकर, ३. अब्दुल रहमान खान, , ४. वसीम साजिद काझी, ५. राहुल कुमार पांडे, , अशी मृताची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघातीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी गाडीचा पत्रा कापून सर्वांना बाहेर काढावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर जखमींची नांवे याप्रमाणे –
चालक मच्छिंद्र आंबोरेंसह अजून दोघे जण गंभीर असून यात अमीरउल्ला चौधरी आणि दिपक खैराल यांचा समावेश आहे. तर अस्फीया रईस चौधरी सुद्धा किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघात स्थळे खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.