---Advertisement---
जळगाव : मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत विजय संपादित केल्यामुळे युवासेना कॉलेज कक्ष जळगावतर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर जल्लोष करण्यात आला.
शिवसेना नेते तथा शिवसेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे व शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासेनेने मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय संपादित केल्याबद्दल शनिवार, 28 सप्टेंबर रोजी जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल ताश्यांच्या गजरात, फटक्यांची आतिषबाजी करत नाचत-गाजत जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हायुवाधिकारी निलेश चौधरी, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रीतम शिंदे, शुभम प्रजापती, राजेश कोळी, ओम चौधरी, श्रेयस कासार, सुशील दोडे, गौरव गालफाडे, दीपक कोळी, भूषण ढवळे, अजय खैरनार, आदित्य पाटील, सर्वेश बोरसे, गणेश सरोदे, तोष्णव महाजन, खुशाल पांडे, अमोल चौधरी आदी युवासैनिक उपस्थित होते.