जळगाव । शहरातील एमआयडीसी एम सेक्टरमधील केक बाईट्स बेकरीवर सिंगल युज प्लास्टिक वापरण्याबाबत मनपाने कारवाई केली आहे. मंगळवार, 7 रोजी सकाळी 9.30 वाजता करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे दहा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर, पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशानुसार, सिंगल युज प्लास्टिक बंदी, पतंगाचा मांजा, आणि अनधिकृत होल्डिंग्जवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवार, 7 रोजी सकाळी 9.30 वाजता एमआयडीसी एम सेक्टरमधील केक बाईट्स बेकरीवर सिंगल युज प्लास्टिक वापरण्याबाबत मनपाने कारवाई केली आहे.
या कारवाईत अंदाजे दहा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर, पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक मनोज राठोड, आणि मुकादम इंद्रजीत घेंगट यांनी केली.