महानगरपालिकेत अधिकार्‍यांची खांदेपालट, नवीन अधिकार्‍यांना दिले स्वतंत्र विभाग

 जळगाव : महानगरपालिकेत अधिकारी कमी असल्याने कामे थांबली असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यातच एकाच अधिकार्‍यांच्या डोक्यावर अतिरिक्त विभागांचे ओझे! यामुळे अधिकार्‍यांनी नेमकं बसायचं कुठे? काम करायचं कोणतं? याबाबत अधिकार्‍यांमध्येही शासंकता होती. पण १० जानेवारी रोजी आयुक्त देविदास पवार यांनी एका पत्राद्वारे अधिकार्‍यांच्या विभागातील जवाबदार्‍यांची खांदेपालट केली असून नव्याने रुजू झालेले सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनाही काही विभागांचा पदभार सोपविण्यात आला आहे.

मनपामध्ये आधीच उपायुक्त (साप्रवि) व उपायुक्त (महसूल) ही दोन पदे रिक्त होती. यामुळे महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पडत नव्हते. यामुळे पुढील आदेश होईपर्यंत या अधिकार्‍यांना त्या – त्या विभागाचा पदभार सोपविण्यात आला. यात सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त (सामान्य प्रशासन) अभिजित बाविस्कर यांना आस्थापना विभाग, टेलिफोन विभाग, जनसंपर्क विभाग, बारनिशी विभाग, जनगणना व निवडणूक (कार्यालय अधीक्षक), महिला व बालकल्याण विभाग, नव्याने रुजू झालेले सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त (महसूल) यांना प्रभाग समिती क्र १ ते ४ विभाग, खुला भूखंड विभाग, मार्केट वसुली विभाग, विधी शाखा विभाग, किरकोळ वसुली विभाग, घरकुल विभाग, एल.बी.टी विभाग, अग्निशमन विभाग, अतिक्रमण विभाग, मिळकत व्यासंस्थापन विभाग यांचा पदभार देण्यात आला.

शाखा अभियंता तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांना दवाखाने विभाग, आरोग्य विभाग, मलेरिया विभाग, स्वच्छता विभाग, वाहन व्यवस्था विभाग. वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे यांना भांडार विभाग, अभिलेख विभाग, एन.यु.एल.एम, क्रीडा विभाग, ग्रंथालय विभाग, शिक्षण विभाग. शाखा अभियंता तथा प्रभारी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांना बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग, विद्युत विभाग, प्रकल्प विभाग. तर आरोग्य अधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू विभागाचे डॉ. विकास पाटील यांना जन्म-मृत्यू विभागाचा पदभार देण्यात आला.

आहे. यात मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांच्याकडे लेखा विभाग, सहाय्यक संचालक नगररचना विभाग के.पी बागुल यांच्याकडे नगर रचना विभाग कायम ठेवला असून अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्याचे प्रभारी उपअभियंता संजय नेमाडे यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग कायम ठेवण्यात आला आहे. याव्यतिरीक्त अभिजित बाविस्कर यांच्याकडे असलेला मुख्य लेखा परीक्षक, सुनील गोराणे यांच्याकडे नगर सचिव विभागाचा पदभार कायम ठेवण्यात आला असल्याचे पत्र आयुक्त देविदास पवार यांनी नुकतेच काढले.