Municipal Council Elections 2025 Result Date : निकाल लांबणीवर, ‘या’ तारखेला होणार जाहीर

---Advertisement---

 

Municipal Council Elections 2025 Result Date : राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल हा 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. शिवाय एक्झिट पोलही सध्या जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्या ऐवजी 21 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर होणार आहे.

काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रह करीत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमाबाबत दाखल याचिकांवरील सुनावणी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात झाली.

त्यावेळी सर्वच ठिकाणांचा निकाल २१ डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी केली. त्यावर निवडणूक आयोगाचे वकील सचिंद्र शेट्ये यांनी यासंदर्भात मंगळवारी दुपारी १२:३०च्या सुमारास निवेदन करू, असे सांगितले होते.

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित होणार होते. मात्र, जेथे पेच निर्माण झाले तेथे २० डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा व २१ डिसेंबरला निकाल घोषित करण्याचा सुधारित आदेश २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता.

दरम्यान, आज मंगळवारी राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल हा 21 डिसेंबरपर्यंत जाहीर न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. शिवाय एक्झिट पोलही सध्या जाहीर न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्या ऐवजी 21 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---