तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सार्वजनिक शौचालयातील वापरात नसलेले व अनावश्यक शिट्सचा शोध घेण्यात आले होते. त्यानुसार शहरातील सार्वजनीक शौचालयातील १ हजार ६५५ शिट्स पैकी ५८७ शिट्स हे अनावश्यक असल्याचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला होता. त्यानुसार हा अहवालानुसार हे अनावश्यक शौचालयातील शिट्स तोडण्यासंदर्भात आयुक्तांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
जळगाव शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही, अशा ८ हजार लाभार्थ्यांना प्रत्येकी १७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यामुळे ८ हजार कुटूंबाकडून वैयक्तिक शौचालयाचा वापर होत आहे. त्यात सार्वजनिक शौचालयाची दैनंदिन स्वच्छता कामी ६ लाख रुपये मक्तेदाराला मनपाला दरमहा द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक शौचालयातील वापरात नसलेल्या शिट्सच्या सर्वेक्षण आरोग्य विभागाने केले. त्यानुसार सार्वजनिक शौचालयाच्या सर्वेक्षणातून ५८७ अनावश्यक शिट्स आढळून आले आहे. हे शिट्स निष्काषित करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त देविदास पवार यांच्याकडे आरोग्य विभागाने पाठविलेला आहे.
अनेक ठिकाणी गैरसोय
सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. काही गरीब वस्त्यांमधील ठिकाणी असलेल्या शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक उघड्यावर शौचास जातात. तसेच बर्याच ठिकाणी नियमित साफसफाई केली जात नाही. याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. मनपा आरोग्य विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष होत असते. सर्वेक्षणासाठी केंद्राची समिती येथे त्यावेळी मात्र सर्वच सावध होतात व कामांना गती येते. त्यामुळे साफसफाईबाबत कायम तत्परता ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.