भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नवोदय विद्यालयामागील शेतात १२ वर्षीय अत्पवयीन मुलाचा खून करण्यात आला होता. ही घटना गुरुवार, १८ जुलै २०२४ रोजी उघडकीस आली होती. पोलिसांच्या तपासात मयत १२ वर्षीय मुलगा लोखंडी पुलाजवळील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे संशयित निष्पन्न केला मात्र पोलीस मागावर असल्याची माहिती कळताच संशयीत पसार झाला. तब्बल महिनाभरानंतर संशयीतास पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेला संशयितदेखील अल्पवयीन आहे. शिव्या दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
गळा आवळून केला खून मयत अल्पवयीन हा संशयिताला शिविगाळ करीत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठी संशयिताने त्याला नवोदय विद्यालयामागील शेतात नेले व तेथे त्याचे कपडे काढून त्याला गळफास दिला. १६ जुलै २०२४ रोजी ही घटना घडल्यानंतर संशयित पसार झाला.
दोन दिवसांनी तालुका पोलिसांना तळवेलला गोदामातून ६० हजारांचे कॉपरची वायर लांबवली चौघा संशयीतांना अटक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेत गट क्रमांक ३१७/१ मधील दक्षिण बांधालगत १८ जुलै रोजी आढळला होता. सुरूवातीला तालुका पोलिसांनी सुरूवातीला तीला अकस्मात मृत्यूची नोंद केली व नंतर मयताची ओळख पटवली व शवविच्छेदन अहवालात मयताचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयताच्या कुटूंबियांनी मयत हा १७ वर्षीय संशयीतासोबत बाहेर पडल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनेच्या दिवसाचे शहरातील विविध भागातील फुटेज गोळा केले व त्यातून संशयीत निश्चित झाल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. रविवारी संशयीताला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. १२ अल्पवयीन मयत हा सातत्याने शिविगाळ करीत असल्याने त्याचा गळा आवळला, अशी कबुली ताब्यातील संशयीताने दिली आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भावी पतीला तरुणीचे फोटो पाठवत लग्न मोडले, वरणगाव शहरातील तरुणाविरोधात गुन्हा
भुसावळ २३ वर्षीय तरुणीच्या भावी पतीला साखरपुड्याच्या दिवशी जुने फोटो पाठवत तरुणीचा साखरपुडा व लग्न मोडण्यात आले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून वरणगावातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरणगाव परिसरातील एका गावातील २३ वर्षीय तरुणीचे बी. कॉम. पर्यंत शिक्षण झाले असून तिची शिक्षण घेताना वरणगावातील तरुणासोबत मैत्री झाली मात्र या तरुणाने तरुणीचा पाठलाग सुरू ठेवत तुझे लग्न दुसरीकडे होवू, देणार नाही, अशी धमकी दिली. रविवार, १८ रोजी तरुणीचा साखरपुडा असताना भावी पतीला तरुणाने जुने फोटो पाठवत तरुणीचा साखरपुडा मोडला. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वरणगावातील संशयित अमित जितेंद्र भंगाळे याच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहे.