---Advertisement---
Extramarital affair : प्रेयसी वारंवार एकच मागणी करायची; याला कंटाळलेल्या प्रियकराने भेटायला बोलावून धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.
पोलीस सुत्रानुसार, रोहितच्या (नाव बदलले आहे) सासरवाडीचा परिसर आणि प्रिया यांचे माहेरजवळच असल्याने रोहित आणि प्रिया यांची वारंवार भेट होत होती. याच भेटीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले.
दरम्यान, प्रिया (नाव बदलले आहे) यांच्या मुलीचे लग्न राजू (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणाशी नुकतेच झाले. या लग्नानंतर प्रिया यांनी रोहितच्या घरी जाऊन त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. मात्र, पत्नी आणि मुले असल्यामुळे रोहित लग्न करण्यास तयार नव्हता. त्यामुळे प्रिया यांचा वारंवारचा हट्ट रोहितला असह्य झाला.
पोलिस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, चौकशीत रोहितने कबूल केले की तो प्रियाला कोलकाताला घेऊन जाण्याच्या बहाण्याने आग्राहून बसने राजूच्या घरातून निघाला होता.
तथापि, पश्चिम बंगालला जाण्याऐवजी तो सोहराब गेट डेपोवरून आग्रा जाण्यासाठी बसमध्ये चढला. वाटेत ते दोघेही हाथरसमधील नागला भूस चौकात उतरले.
त्यानंतर लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रिया यांच्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रोहितने त्याच निर्जन रस्त्यावर प्रिया यांचा गळा दाबून खून केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रोहितविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आली आहे. दरम्यान, अनैतिक संबंध आणि लग्नाच्या मागणीमुळे झालेल्या या हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.









