Extramarital affair : अनैतिक संबंधांत अडसर; ऊसाच्या शेतातच कडाक्याचे भांडण झाले अन् भयंकर घडलं…

---Advertisement---

 

Extramarital affair : अनैतिक संबंधांतून आतापर्यंत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशात पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या पत्नीला पतीनेच कायमचे संपविले. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून, आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जकप्पा पुजारी असे आरोपी पतीचे, तर सविता जकप्पा पुजारी (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, जकप्पा पुजारी हा ऊसतोडणी कामगार होता. त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याला पत्नी सविता वारंवार विरोध करत होती.

दरम्यान, जकप्पा पुजारी हा नुकताच शेतात ऊस तोडण्यासाठी आला होता. या वेळी याच कारणावरून दोघांत वाद झाला. संतापलेल्या जकाप्पाने जवळच असलेल्या विळ्याने आपल्या पत्नीवर हल्ला केला. त्याने सविताच्या डोक्यावर आणि मानेवर अनेक वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उधार, उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण आणि मंद्रुप पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाड जप्त केली असून, आरोपी जकाप्पा याला ताब्यात घेतले आहे. सोलापूरच्या वडापूर गावात ही धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी उपनिरीक्षक राजकुमार डांगे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---