जळगाव : जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेचे 5 वर्षांत फक्त 72 लाभार्थी या मथळ्याखाली 16 नोव्हेंबर रोजी तरूण भारतने वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी चार वर्ष प्रलंबित प्रस्तावप्रकरणी या योजनेचा टेबल असलेल्या महिला व बाल कल्याण विभागातील तत्कालीन वरिष्ठ लिपीक अमोल तडवी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देत नोटीस बजावली आहे. आठवडाभरात या योजनेच्या वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून पाच वर्षांत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या फक्त 72 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून याप्रकरणाचे प्रस्ताव निधी प्राप्त असून धुळखात पडून राहिले. मात्र जि.प.सीईओंनी या प्रलंबित प्रस्तावांची दखल घेत शुक्रवारी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांना या प्रस्तावासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. सन 2017 ते 2019 या काळात 72 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. त्यानंतर सन 2019 ते आजपर्यंत चार वर्षात जि.प. महिला बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पडून होते.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून पाच वर्षांत माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या फक्त 72 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून याप्रकरणाचे प्रस्ताव निधी प्राप्त असून धुळखात पडून राहिले. मात्र जि.प.सीईओ डॉ.पकंज आशिया यांनी या प्रलंबित प्रस्तावांची दखल घेत शुक्रवारी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांना या प्रस्तावासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित अर्ज केेलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे
सन 2019 ते 2022 चार वर्षाच्या काळात 103 प्रस्ताव प्राप्त झाले. मात्र त्यात 45 प्रस्ताव पात्र तर 58 प्रस्तावांची कागदोपत्री तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जि.प.सीईओंनी याकडे तातडीने लक्ष दिल्याने आठवडाभरात या लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योजनेंतर्गत एक किवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्र्रक्रिया केल्यानंतर पालकाच्या मुलीच्या नावाने 50 हजारांची रक्कम डिपॉझिट ठेवण्यात येते. 17 वर्षांनंतर संबंधित मुलीला त्या रकमेच्या व्याजासह एक लाख रुपये प्राप्त होतात.