Pachora : बंद घर उघडताच असे काही दिसले , पाहून गाव झाले थक्क ?

पाचोरा : तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील विलास बाबूराव पाटील यांच्या बंद घरामध्ये सुमारे २० फूट खोलीचे मोठे भुयार आढळून आले असून, या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

या घराचे मालक विलास पाटील हे पोलीस दलात कार्यरत असून पाचोरा शहरातील आशीर्वाद ड्रीम सिटी भागात राहतात, तर वाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या मालकीचे माती विटांचे एक मोठे घर आहे. विलास पाटील पाचोरा शहरात वास्तव्यात असल्याने त्यांचे या घरात मागील अनेक दिवसांपासून जाणे येणे नव्हते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांनी काही कामानिमित्त घर उघडून बघितले असता घरामध्ये सुमारे २० फूट खोल व १० फूट रुंदीचा मोठा खड्डा पडत्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

महसूल प्रशासनाने घेतली दखल
या घटनेची माहिती पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी भूषण अहिरे तसेच तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना दिल्यानंतर प्रशासनाने या विषयाची तातडीने दखल घेऊन घटनास्थळाचा पाहणी करण्यासाठी धाव घेतली. अचानक पडलेल्या या भुयाराची गावात व परिसरात मोठी चर्चा होत आहे. नेमके हे भुयार कशामुळे पडले? जमिनीचा भाग खचला की यातून भुयारी मार्ग आहेत? याविषयी तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.