Nagpur Crime : नागपूरमध्ये लग्नाचे आमिष दाखवत एका महिला डॉक्टरवर अत्याचार केल्या प्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महिलेने शुक्रवारी (११ एप्रिल) नागपूरमधील इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती आणि ३० वर्षीय आयपीएस अधिकारी यांची नोव्हेंबर २०२२ मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामद्वारे ओळख झाली होती. आधी त्यांचे ऑनलाईन बोलणे व्हायचे नंतर काही दिवसांनी त्यांचे कॉल वर बोलणे चालू झाले.
पोलिसांनी सांगितले की, त्यावेळी आरोपी ‘यूपीएससी’ परीक्षेची तयारी करत होता, तर महिला एमबीबीएस शिकत होती. बराच वेळ ऑनलाइन चॅट केल्यानंतर, दोघेही फोन कॉलवर बोलू लागले. तिने सांगितले की मैत्री झाल्यानंतर आरोपीने २८ वर्षीय महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) मध्ये निवड झाल्यानंतर, आरोपीने महिलेपासून दूर जाऊ लागला. नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या कुटुंबानेही महिलेला कोणतेही उत्तर दिले नाही, ज्यामुळे ती नाराज झाली. त्यानंतर तिने इमामवाडा पोलिसांकडे तक्रार केली.
भारतीय पोलिस सेवेत निवड झाल्यानंतर, आरोपीने महिलेपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे शनिवारी आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.