उच्च-वाढीचे, उत्तम जीवनशैलीचे शहरी केंद्र म्हणून नागपूरचा उदय

---Advertisement---

 

नागपूर : महाराष्ट्राच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) तिसऱ्या क्रमांकाचे योगदान देणारे नागपूर, आधुनिक भारताच्या विकासाचे प्रतिबिंब दाखवणारे एक गतिशील केंद्र म्हणून उदयास येत असल्याने नागपूर म्हणजे मध्य भारताची नव्याने ओळख निर्माण होत आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून विदर्भातील नागपूर शहराची ओळख आहे. विदर्भातील त्याच्या स्थानामुळे मजबूत लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी उपलब्ध होते. गेल्या दशकात, हे शहर प्रशासकीय आणि प्रादेशिक व्यावसायिक केंद्रातून एका वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेकडे वळले आहे.

स्मार्ट सिटी उपक्रम आणि समृद्धी महामार्गामुळे कनेक्टिव्हिटीला अधिकच चालना मिळाली आहे, ज्यामुळे नैसर्गिक समृद्धीसोबतच औद्योगिक विकासालाही पाठिंबा मिळत आहे.

भारतातील सर्वात मोठ्या मल्टी-मॉडल कार्गो आणि सेझ प्रकल्पांपैकी एक असलेला मिहान (MIHAN) हा प्रकल्प, एअर कार्गो, आयटी पार्क, उत्पादन क्लस्टर आणि सेवांना एकत्रित करतो, ज्यामुळे नागपूरची लॉजिस्टिक्स आणि एरोस्पेस क्षेत्रातील क्षमता अधिक मजबूत होते.

सरकारी शहरी-सुधारणा पॅकेजेसद्वारे पायाभूत सुविधांमध्ये प्रगती होत आहे, ज्यात रस्ते, पाणीपुरवठा प्रणाली, ड्रेनेज आणि हरित जागांसाठी ३१५ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी मिशन आणि २०२१ च्या मास्टर प्लॅन अंतर्गत सुशासन, गतिशीलता आणि शाश्वत विकासाची प्रगती होत आहे. प्रस्तावित आयबीएफसी, मेट्रो विस्तार आणि वाढते एमआयडीसी क्षेत्र यांसारखे आगामी प्रकल्प, तसेच प्रादेशिक खनिज संसाधने आणि प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांची उपस्थिती, मध्य भारतातील व्यवसाय आणि लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नागपूरची वाढती ख्याती आणि भूमिका आणखी मजबूत करतात.

रिअल इस्टेट क्षेत्रही आघाडीवर

वरील मोठ्या घडामोडींसोबतच, मजबूत कनेक्टिव्हिटी, वाढती आर्थिक क्रियाकलाप आणि चांगल्या राहणीमानासाठी वाढत्या मागणीमुळे या प्रदेशात रिअल इस्टेट क्षेत्रही या शहराची वेगळी ओळख आणि त्याचा झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे शहराचे वेगाने महत्त्व वाढवत आहे.

या संदर्भात, देशातील सर्वात मोठी ब्रँडेड जमीन विकासक कंपनी, ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ (HoABL) नागपूरमध्ये आपला वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे, जो शहरात आधुनिक डिझाइन, पारदर्शकता आणि जीवनशैली-केंद्रित विकास आणणार आहे.

हा आगामी प्लॉटेड डेव्हलपमेंट प्रकल्प नागपूरच्या नैऋत्य भागात आणि हिंगणा तालुक्यात आहे, जो एक वेगाने विकसित होणारा कॉरिडॉर असून एक प्रमुख निवासी आणि विकास-केंद्रित क्षेत्र म्हणून उदयास येत आहे.

अॅनारॉकच्या मते, या प्रकल्पाला २०२४ मध्ये जमीन संपादनाच्या आकारानुसार १६ टक्के बाजारातील वाटा मिळवून देशातील नंबर एकचा विकासक म्हणून स्थान मिळाले आहे. या ब्रँडचे आता पाच राज्यांमध्ये १९ प्रकल्प आहेत, जे त्याची वाढती राष्ट्रीय उपस्थिती दर्शवितात. त्यांचा सर्वात मोठा विस्तार महाराष्ट्रात आहे. ६१४ एकर किंवा २६.७ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रावर या प्रकल्पाचे विकासकार्य सुरू आहे.

केवळ पाच वर्षांत, ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ ने १४ दशलक्ष चौरस फूट जागा विकली तर २६ दशलक्ष चौरस फूट क्षेत्रावर सक्रियपणे विकासकार्य सुरू आहे. त्यांनी आपले सर्व प्रकल्प वेळेच्या आधी पूर्ण केले आहेत.

त्याच्या ग्राहकवर्गामध्ये २५ देशांतील, २३ राज्यांमधील आणि १०७ शहरांमधील ६,००० पेक्षा अधिक खरेदीदारांचा समावेश आहे, जे या ब्रँडने अल्पावधीतच निर्माण केलेला विश्वास आणि पोहोच पावती दर्शवते.

एकत्रितपणे हे बदल एका अशा शहराचे संकेत देतात, जे परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहेत, जिथे पायाभूत सुविधा, उद्योग आणि जीवनशैली एकत्र येऊन नागपूरला वाढ, गुंतवणूक आणि आधुनिक जीवनासाठी भारतातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून आकार देत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---