जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘नमो महासन्मान निधी’ची प्रतीक्षा

जळगाव : राज्य शासनाने पीएम किसानच्या धर्तीवर गतवर्षी २०२३ मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेव्दारे पहिला हप्ता नोव्हेंबर, तर दुसऱ्या व तिसऱ्या दोन हप्त्यांचा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२४ अखेर मिळाला असून, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जूनमध्ये मिळणे अपेक्षित होते. मात्र त्या हप्त्याची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.
सद्यःस्थितीत राज्य सरकारकडून विविध योजनांच्या घोषणांचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे जूनमध्ये अपेक्षित असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. संपूर्ण देशभरात १८ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २८ फ `ब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते म्हणजेच दुसरा व तिसरा हप्ता व पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता
वितरित करण्यात आलेला होता.

रासायनिक खते वा मजुरीसाठी लागणार हातभार
राज्य सरकारकडून सद्यःस्थितीत विविध घोषणांचा महावर्षाव केला जात आहे. यात नमो महासन्मान योजनेचा निधीसाठी तरतूद होवून लाभाचा चौथा हप्त्याचे वितरण होणे अपेक्षित होते सद्यस्थितीत शेतकरीवर्गकडून खरीप पेरणीनंतर पिकांच्या निंदणी, कोळपणी, बागायती कपाशीची खुरपणी आदी अंतर्गत मशागतीची कामे सुरू असून रासायनिक खत मात्रा दिली जात आहे. रासायनिक खते व अंतर्गत मशागत मजुरी देण्यासाठी या सन्मान निधीचा हातभार शेतकयांना होणार असून चौथ्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.

पीएम किसानचा लाभ
जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचे सुमारे ४ लाख ३१ हजार ८८९ लाभार्थी आहेत. यातील बहुतांश पात्र लाभार्थ्यांना डीबीटी योजनेव्दारे थेट त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत १७ व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळाला आहे. सार्वत्रिक निवडणूक संपल्यानंतर जून महिन्यात पीएम किसान योजनेचा १७ व्या हप्त्याची रकम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्ताची हप्त्याची ओढ शेतकऱ्यांना लागलेली आहे.

अशी आहे पीएम किसान लाभार्थी स्थिती
जिल्ह्यात २०१९/२० दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू झाली. त्यानुसार जिल्ह्यात आठ अ नुसार कृषी क्षेत्र धारण करीत असलेल्या सुमारे ४ लाख ५० हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यात २०२१ दरम्यान १३ हजाराहून अधिक शेतकरी करपात्र उत्पन्न असलेले निष्पन्न झाले होते. यात झालेल्या सर्वेक्षणानुसार करपात्र शेतकऱ्यांना या लाभातून वगळण्यात आले असून आतापर्यंत सुमारे ६ कोटीहून अधिक रकमेचा परतावा या करपात्र शेतकऱ्यांकडून शासनाला करण्यात आला असत्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

२० हजाराहून अधिक शेतकरी नोंदी अपूर्ण

जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचे ४ लाख ३१ हजार ८८९ शेतकरी लाभार्थी आहेत. त्यात केंद्र शासन निर्देशानुसार शेतकरी लाभार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी ईकेवायसी जोडणी करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार ४ लाख ११ हजार ५७६ (९५ टक्के) लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्याशी इकेवायसी जोडणी पूर्ण झालेली आहे. यात ३ लाख ९८ हजार ५३९ शेतकऱ्यांची जमीनीशी संबंधीत अद्यावत नोंद, इकेवायसी सीडींग आदी नोंदी परिपूर्ण आहेत. अजूनही २० हजार ३१३ शेतकऱ्यांची बँक खात्याशी ईकेवायसी आधार सिडींग जोडणी झालेली नाही. त्यामुळे किसान सन्मान योजना लाभ वितरीत झालेला असला तरी तो या शेतकऱ्यांना मिळू शकलेला नाही

लाभार्थ्यांनी ईकेवायसी जोडणी करून घ्यावी
पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे तसेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान या लाभाचे तिसऱ्या हप्त्याचे वितरण झालेले आहे. केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे दोन्ही मिळून १२ हजार रुपये लाभ मिळत असून या लाभासाठी लाभार्थ्यांचे बँक खात्याशी मोबाईल व आधार क्रमांक ईकेवायसी जोडणी करणे आवश्यक आहे. प्रशासनाने यासंदर्भात वेळोवेळी आवाहन केले असून आतापर्यत पात्र व नोंदणी केलेल्या लाभाथ्यपिकी २० हजार ३१३ लाभार्थ्यांचे संबंधित बँक खात्याशी आधार सिडींग झालेले नाही. लाभार्थ्यांनी तातडीने सीएससी सेंटर आपले सरकार केंद्र वा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधून ईकेवायसी करून घ्यावे.