नंदुरबार : शहादा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावर झालेल्या कारच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे. अमरसिंग गिरासे आणि विजय सोनवणे असे दोघांचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण हाेता की कारचा संपुर्णत:चक्काचूर झाला.
या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार, या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. त्यानंतर एका झाडाला जाऊन जोरदार धडकली. त्यामुळे कारचे माेठे नुकसान झाले. पाेलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या अपघातात दाेन जण ठार झाले आहेत. हे दोघे शहादा तालुक्यातील रहिवासी आहेत.
घटनास्थळ आणि पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अमरसिंग धनसिंग गिरासे आणि विजय श्रावण सोनवणे हे दाेघे कारने डोंगरगावकडून शहाद्याकडे निघाले हाेते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने तीन पलटी घेतल्या तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेला झाडाला जबरदस्त ठोकर मारली. यामध्ये अमरसिंग (दराने रोहाने हल्ले मुक्काम लोणखेडा) व विजय याचा मृत्यू झाला.