---Advertisement---
Nandurbar Accident : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखरावर विराजमान असलेल्या अस्तंबा ऋषी महाराजांची यात्रा भरते ही यात्रा पूर्ण करून परत येणाऱ्या यात्रेकरू वाहनाला चांदसैली घाटात अपघात होऊन या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. १२ गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन रुग्णांवर तळोदा उपजिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अंस्तबा ऋषींची यात्रोत्सव सुरू आहे. सातपुडा पर्वत रागेतील सर्वात उंच शिखर असलेल्या अस्तंबा ऋषी महाराजांची यात्रा पूर्ण करून परत येणाऱ्या भाविकांच्या पिकअपवर काळाने घाला घातला. चांदशैली घाटात माकड टेकडीच्या वळणावर पिकअप वाहन क्र. MH. 39. AD. 2802 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्दैवी भिषण अपघात झाला यात वाहन दरीत पलटी होऊन त्यातील सर्व प्रवासी फेकले जाऊन जखमी झाले.
तळोदा शहरापासून १४ किलोमिटर अंतरावर असलेल्या चांदशैली घाटात पिकअप टॅम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून या पिकअप टॅम्पोमध्ये ४० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होत अस्तंबा येथे दर्शन घेऊन येताना पिकअप उलटून वाहनाचा भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याशिवाय तळोदा पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांकडून सर्वतोपरी मदतकार्य करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
मृतांची नावे
भूषण राजेंद्र गोसावी वय 30, पवन गुलाब मिस्त्री वय 24, बापू छगन धनगर वय 24, राहुल गुलाब मिस्त्री वय 24, चेतन पावबा पाटील वय 23 हे सर्व घोटाणे ता नंदुरबार येथील आहेत तर हिरालाल जगन भिल वय 40, योगेश लक्ष्मण ठाकरे वय 45, दोघे राहणार कोरीट ता नंदुरबार, गणेश संजय भिलावे वय 15 राहणार शबरी अटी, नंदुरबार.
जखमींची नावे
रविराज ठाकरे, कृष्णा पाडवी राहणार बाळदा परविन संजय वाघ राहणार भादा, अर्जुन युवराज सोनवणे , नमन मुकेश गायकवाड राहणार तळोदा, राहुल सायसिंग ठाकरे, सागर राजू ठाकरे राहणार समशेरपुर, दिनेश रतिलाल ठाकरे, कार्तिक योगेश थोरात राहणार वेलदा, दीपक हिंमत गोसावी, सागर चुडामन पाटील, गणेश सुभाष गोसावी, बापू खंडू पाटील, कृष्णा अशोक मिस्त्री राहणार घोटाणे आहेत . गंभीरजखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलविण्यत आले ३ जखमींनवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.