नंदुरबार : ठाणे येथील भंगार व्यावसायिक औरंगजेब शेखावत यांना जंगलात नेऊन लुटणाऱ्या सहा संशयितांना एलसीबीच्या पथकाने साक्री तालुक्यातील जामदा येथून बेड्या ठोकल्या संशयितांकडून आहेत. ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या तीन दिवसांत गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लाल ऊर्फ सजिन निला भोसले, कनेश निला भोसले, भुऱ्या निला भोसले, जैन जयदेत पवार, हरेष शामराव भोसले व सोनेश विनायक चव्हाण (सर्व रा. जामदा, ता. साक्री) असे संशयीतांची नावे आहेत.
२३ रोजी ठाणे येथील भंगार व्यापारी औरंगजेब सय्यद शेखावत यांना स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने काही जणांनी नंदुरबार रेल्वे स्थानकावरून दुचाकीवर जबरदस्तीने बसवून जंगलात नेले होते. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल, ऑनलाइन पेमेंट हे जबरीने घेऊन त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती.
याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एलसीबीकडून समांतर तपास सुरू असताना संशयित साक्री तालुक्यातील जामदा येथील असल्याचे समजले. त्यानुसार पथक रवाना केले असता संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील भामरे, पोहेकॉ. राकेश वसावे, बापू बागुल, विशाल नागरे, पोकों, अभय राजपुत, दीपक न्हावी, आनंदा मराठे, सतीश घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, संशयीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.