---Advertisement---

लहान मुलांचा वाद अन् भिडले मोठ्यांचे दोन गट, डोक्यात टाकली थेट लोखंडी सळई !

---Advertisement---

नंदुरबार : लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून दोन गटांत झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाल्याची घटना नंदुरबारातील मन्यार मोहल्ला भागात घडली. परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पहिली फिर्याद अबरार अहेमद कुरेशी यांनी दिली. लहान मुले मस्ती करीत असताना त्यांना बोलल्याचा राग येऊन फारुख खान दाऊद खान कुरेशी व इतरांनी वाद घालत मारहाण केली.

लोखंडी सळईने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. अबरार अहेमद कुरेशी यांनी फिर्याद दिल्याने फारुख खान दाऊद खान कुरेशी, रऊफ खान दाऊद खान कुरेशी, कामू खान दाऊद खान कुरेशी, जुनेद खान दाऊद खान कुरेशी, साहिस्थे खान फारुख खान कुरेशी सर्व रा. मन्यार मोहल्ला, नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

दुसरी फिर्याद फारुख खान दाऊद खान कुरेशी यांनी दिली. लहान मुले खेळत असताना अमीन सत्तारशेख यांनी शिवीगाळ केली. त्यांना शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता त्याचा राग येऊन त्याने व इतरांनी लोखंडी सळई, विटा मारून गंभीर जखमी केले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

फारुख खान कुरेशी यांनी फिर्याद दिल्याने अमीन सत्तारशेख, अबरार शेख अमीन शेख, जुनेद शेख अमीन शेख कुरेशी, मुबीन शेख अमीन शेख कुरेशी, सादिक शेख सत्तार शेख कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---